Nojoto: Largest Storytelling Platform

"हो.. त्यांच्या गौरी वाघाने नेल्या .." प्रत्येक

 "हो.. त्यांच्या गौरी वाघाने नेल्या .." 

प्रत्येक वेळी ती आईला, आजीला विचारायची.. सगळ्यांच्या घरी गौरी गणपती असतात.. आपल्या घरी का नाही येत गौरी.. आई सांगायची आपल्याकडे नसला सण म्हणून काय झालं.. गौरी आपल्या पाठीशी वर्षभर उभ्या असतात.. पण एवढ्या उत्तराने तिचे कधी समाधान झाले नाही.. एकदा आजीने बोलता बोलता सांगितले आपल्या गौराया वाघरू घेऊन गेला, म्हणून आपल्याकडे गौरी नसतात.. घरात असेच शिळोप्याच्या गप्पा चालू असताना तिला एक दिवस कळलीच ती गोष्ट.. काही पिढ्या आधी घडलेली गोष्ट.. 

कोकणातले वरच्या आळीमधले ते ऐसपैस घर.. माणसांच्या मनासारखेच मोकळे ढाकळे ..  square foot च्या चौकटी नसलेले..  ओसरी पडवी ओलांडून गेल्यावर कौलारू घर.. मागे परसदार आणि परसातून मागे नजर पोचेल तिथपर्यंत वाडी.. वाडी मध्ये उंचीची स्पर्धा करणारी नारळी पोफळीची झाडं.. त्यामागे आमराई.. त्यात असणारी विहीर आणि तिला लावलेले रहाट गाडगे.. आणि वाडीतून मागे जाणारी पायवाट थेट समुद्रकाठी पोचणारी.. समुद्राची गाज माडाच्या सावलीत निवांत बसल्यावर पण यायची.. आणि नजर उचलल्यावर दिसायचे प्रदूषणाची झालर नसलेले निळेशार आकाश.. 
या निसर्गाच्या कुशीत असणारी माणसं तिथल्या मातीतल्या फणसासारखीच.. तिरकस काटेरी बोलणे पण मनातून गोडवा.. सहज म्हणून २०-२५ माणसं तरी असायचीच घरामध्ये.. त्यावेळी काही त्याला joint-family वगैरे म्हणायची पद्धत नव्हती.. परत माधुकरी साठी वारावर जेवायला येणारे वेगळेच.. आई वडील, त्यांची मुलं, आणि पुढच्या पिढीतले मुलं, सुना आणि नातवंड.. एखादी आलवणामधली आत्या आणि तिची मुलं.. मुली आपापल्या संसारात.. 
बयो हि या घरातील सगळ्यात महत्वाची व्यक्ती.. वयाने, मानाने, अधिकाराने आणि कर्तव्याने थोर.. त्यांचं मूळ नाव सुलक्षणा.. त्यांचा उत्साह लहान पोराला लाजवेल असा…आणि त्यात आता तर काय.. गौरी गणपती चा सण म्हणजे उत्साहाला आलेलं उधाण.. गणपती तर रुबाबात बसलाच होता.. आणि गौराई यायचीच वाट बघत होता.. 
तो दिवस गौरी आवाहनाचा.. तिन्ही सांजेला समुद्राकाठी जाऊन खडे आणायचे आणि त्यांची मनोभावे पूजा करायची .. घरात एकीकडे नैवेद्याची तयारी चालू होती.. एकीकडे सजावट चालू होती.. बयो अष्टभुजा असल्यासारखी सगळ्या गोष्टींमध्ये जातीने लक्ष घालत होती.. आणि सगळे मार्गी लागल्यावर तिने स्वतःचे आवरायला वेळ काढला..

sandyjournalist7382

sandy

New Creator