Nojoto: Largest Storytelling Platform

कवी,कवी कसे बनले मला नाही कळले लिहिल्या खूप कविता

कवी,कवी कसे बनले
मला नाही कळले
लिहिल्या खूप कविता 
त्यांचे यमक कसें जुळले 

मलाही आला जोश
बसलो कविता लिहायला
गाडी मध्येच थांबली
फोन लागला वाजायला

बघितले जेव्हा मी
होता मित्राचा फोन
बोलला उद्या आहे कार्यक्रम
कविता लिही चार दोन

भरपूर वाचल्या कविता 
तेव्हा लागले कळायला
कसले यमक अन कसले काय
शब्द लागले जुळायला

कवी लिहितात भावनेने
नाही नुसत्या शब्दाने
मलाही लागले जमायला
जेव्हा साथ दिली मनाने

लिहिले एक पान
मनास वाटले समाधान
दचकन उठलो झोपेतून
तेव्हा कळले स्वप्न पडले छान कवी बनतो तेव्हा,,,
कवी,कवी कसे बनले
मला नाही कळले
लिहिल्या खूप कविता 
त्यांचे यमक कसें जुळले 

मलाही आला जोश
बसलो कविता लिहायला
गाडी मध्येच थांबली
फोन लागला वाजायला

बघितले जेव्हा मी
होता मित्राचा फोन
बोलला उद्या आहे कार्यक्रम
कविता लिही चार दोन

भरपूर वाचल्या कविता 
तेव्हा लागले कळायला
कसले यमक अन कसले काय
शब्द लागले जुळायला

कवी लिहितात भावनेने
नाही नुसत्या शब्दाने
मलाही लागले जमायला
जेव्हा साथ दिली मनाने

लिहिले एक पान
मनास वाटले समाधान
दचकन उठलो झोपेतून
तेव्हा कळले स्वप्न पडले छान कवी बनतो तेव्हा,,,