मैत्री मैत्री म्हणजे आपुलकी, विश्वास, श्रध्दा आणि श्वास यांची सांगड घालुन जी बाग फुलविली जाते, ती बाग मैत्रीची. तर मग, मैत्री कशी असावी ? ? फुलांच्या बागेसारखी सुंदर व मोहक अशी आसमंत दरवळणारी मैत्री असावी. . . त्या मैत्रीच्या बागेची काळजी घेण्याची तळमळ प्रत्येकाच्याच काळजात सदा तेवत असावी. . . ज्याप्रमाणे, बागेची प्रेमपुर्वक काळजी घेतल्याशिवाय बागेला सौंदर्य व मनमोहक बहर प्राप्त होत नाही. . . त्याचप्रमाणे, मैत्रीची ही प्रेमपुर्वक काळजी घेतल्याशिवाय मैत्री परिपूर्ण होत नाही . . . कारण, मैत्री ही बागेतील पालापाचोळ्यासारखी असते, घट्ट पकडली तर चुरा होते आणि सैल सोडली तर हवेत उडून जाते. . . तर मैत्री अशी असावी नेहमीच सत्याचा ध्यास घेणारी सर्वांना आपलेसं करणारी पणतीसारखी सर्वांना प्रकाश देणारी. . . मला वाटते, मैत्री ही तर आरशाप्रमाणे पारदर्शक असावी, कारण. . . सर्वांची लपलेली गुपिते फक्त मैत्रीमुळेच उघडकीस येतात ना. . . © रोशन पाटील मैत्री मैत्री म्हणजे आपुलकी, विश्वास, श्रध्दा आणि श्वास यांची सांगड घालुन जी बाग फुलविली जाते, ती बाग मैत्रीची. तर मग, मैत्री कशी असावी ? ? फुलांच्या बागेसारखी सुंदर व मोहक अशी