भावगीत जीवनाच्या वळणावरती उगवली ही पहाट भावनेच्या निखाऱ्यातून तेजळली नवी वाट ll धृ ll तिमिरानी झाकोळली इथे ज्ञान किरणे अफाट ओथंबलेल्या नशिबाची कधी येईल यशाची लाटll १ll सुख समृध्दी साठी आम्ही फोडीले घामाचे पाट ज्ञानार्जन कष्ट करूनी भरले इथे विद्येचे माठ ll २ll अर्धवटांची टोळी आंधळी फिरते गर्दीत इथे सुसाट प्रज्ञावंत इथंच विरले जरी त्यांचे सरले वय साठll ३ll कवी व गायक श्री राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले मो. क्र .९३२५५८४८४५ ©rajendrakumar bhosale #भावगीत #MySun