अजून मी मलाच नाही कळलो. इतरांनी मला कळून घेतले; परंतु, अजून मी मलाच नाही कळलो. कुणी काही म्हणा; प्रत्येकाच्या मदतीसाठी मी दुःख सारे विसरून आहे वळलो. अपेक्षा ठेऊन काम करण्यासाठी मी कधीच नाही धजलो. खोटी प्रशंसा करणाऱ्यांपासून मी मात्र आहे पळलो. नवीन वाट शोधण्याच्या इच्छेने मी जुन्या वाटेवरती कधीच नाही रुळलो. लोकं म्हणतात सारे, मी तुला ओळखून आहे. त्यांना जसा मी कळलो, तसा अजून मी स्वतःलाच नाही कळलो. #अजून मी मलाच कळलो नाही.