प्रॉब्लेम खूप काही बोलायचं असतं, खूप काही सांगायचं असतं. पण बऱ्याचदा योग्य व्यक्तीच सापडत नसते. किंवा आपण जिला योग्य समजतो ती खरं तर फक्त गॉसिप करण्याचा विषय म्हणून आपल्याकडे बघत असते. अशावेळेस एक तर आपण अलिप्त होऊन जातो त्या गोष्टीपासून किंवा त्या व्यक्तीपासून. मनातल्या भावना मात्र तशाच राहतात. हळूहळू अशा भावनांचा ढिगारा साचतच राहतो. त्यांचा योग्य पद्धतीने निचरा करणं खूप गरजेचं असतं. ते करण्यासाठी खुप काही करावं लागतं नाही फक्त एकदा तटस्थ दृष्टीने स्वतःकडे आणि त्या त्रास देणाऱ्या प्रॉब्लेमकडे बघायचं. त्याची तीव्रता काय आहे, तो कशामुळे प्रॉब्लेम वाटतोय , खूप सारी एनर्जी खर्च करावी असा आहे का? लगेच नाही पण हळूहळू काही उत्तरं आपोआप सापडतील, काही शोधावी लागतील. सुरुवातीला मन दुःखाला कवटाळून बसण्याचा प्रयत्न करेल पण आपणच त्याला समजावून लाडीगोडी लावून दुसरीकडे वळवायचं. प्रॉब्लेम तर येतातच मुळी आपल्याला तावून सुलाखून तयार करण्यासाठी. गरज असते ती फक्त त्यांना ओळीने उभं करून स्वतःशी सावकाश वागत सोडवण्याची. मीही प्रयत्नच करतेय तुम्हीही बघा ट्राय करून. बेस्ट लक.शुभं भवतु!!! #प्रॉब्लेम