Nojoto: Largest Storytelling Platform

कृष्णामाई निळ्या निळ्या पाण्यामध्ये निळी निळी शां

कृष्णामाई

निळ्या निळ्या पाण्यामध्ये
निळी निळी शांतता
संथ वाहते कृष्णामाई
निळी ती अथांगता

हिरवे हिरवे वृक्ष उभे
हात जोडूनी तटा
फुलेवेली फुलूनिया
सज्ज दिसती स्वागता

कुणी करती प्रातःस्नान
कुणी करते अर्ध्यदान
पोटी घेते सर्व घाण
करूनी खरी स्वच्छता

धन्य ती क्षमावान
भागवते ती तहान
पशूपक्ष्यांचे जीवन
ही जणू जलदेवता

लाख उठती तरंग
पाहूनी मन झाले दंग
वस्त्रधुता वाजे मृदंग
पाहूनी ती एकता कृष्णामाई
कृष्णामाई

निळ्या निळ्या पाण्यामध्ये
निळी निळी शांतता
संथ वाहते कृष्णामाई
निळी ती अथांगता

हिरवे हिरवे वृक्ष उभे
हात जोडूनी तटा
फुलेवेली फुलूनिया
सज्ज दिसती स्वागता

कुणी करती प्रातःस्नान
कुणी करते अर्ध्यदान
पोटी घेते सर्व घाण
करूनी खरी स्वच्छता

धन्य ती क्षमावान
भागवते ती तहान
पशूपक्ष्यांचे जीवन
ही जणू जलदेवता

लाख उठती तरंग
पाहूनी मन झाले दंग
वस्त्रधुता वाजे मृदंग
पाहूनी ती एकता कृष्णामाई