महामानवा वंदन -------------------------------------------------------- भारत मातेच्या पावन भूमी जन्मले हो भीमराव रामजी भिमाईचे संस्कार बोले उजेड अंधाराला दाव संत तुकाराम कबीर जींचे विचार अभ्यासिले ध्यानी शिक्षित हो वो समाज माझा हे ध्येय पेटले मनी दिव्या खाली रात जागिली ज्ञान भराया मती असस्पृश्यतेची कीड समाजा मिटून जाव्या जाती दलित शोषित श्रमिकांच्या दूर व्हाव्या अंधाऱ्या राती समाज क्रांतीचे दीप चेतवूनी ज्ञानाची मशाल घेतली हाती वंचित नको समाज कोणता अशी केली कायद्याची मांडणी संविधानाचे लेखन सांगे हे शिल्पकार किती धोरणी हीन तिरस्कार कोण करावा अखंड ज्ञानाच्या या ज्योतीचा अविरत चाले कार्य तयाचे, त्यांच्या गुण हा विचारांचा भविष्य उद्याचे तुझ्या हाती रे तूच देशाचा नेता हो उज्ज्वल हो वो देश आपुला म्हणूनि तू शिक्षित हो बौद्धिक सामाजिक गुलाम गिरीचे तोडीले सारे बंधन भेद,अज्ञान,भ्रष्ट,गुलामी सोडूनि करू ज्ञानाचे नंदन राष्ट्र निष्ठा ठायी भरली आम्ही या मातीची संतान सर्वांना सम हक्क मिळाला साहेबांचं वरदान अर्पित जीवन सदैव ज्याने केले देश हिताचे चिंतन मानवतेचा विचार बोलतो करू अशा महामानवा वंदन साहिल-ए-युसूफ ©yusuf sayyad #Ambedkar_महापरिनिर्वाण #Hum_bhartiya_hain