Nojoto: Largest Storytelling Platform

नंदादीप खोल शुभ्र धुक्यातुनी, एकसंत चालतं राहिले

नंदादीप 

खोल शुभ्र धुक्यातुनी, एकसंत चालतं राहिले, 
एक नित्य तेवणारा, दीप शोधतं चालले, 
निःशब्द-नीरव शांतता एकच चिरत चालले, 
कुणा सोबततीची न आशा बेफिकीर मन हे जाहले... !

दूरचा प्रवास तो, जरि हजार वाटा, 
शीतल-धवल धुक्यातुनी,एक ऊब शोधत जायचे
न  थांग लागे नंदादीपा, 
हताश-भाबडे मन तरि जीव तोडुनी चालले...!

संलग्न मुका प्रवास जेव्हा थांबला त्या ज्योतीपुढे, 
थकल्या जीवाच्या देहावरुनी,सुवर्णबिंब अवघे बरसले, 
अल्हादाच्या सीमा तोडुनी,मन बेभान होऊनि नाचले, 
तेव्हा कुठे ते गडद धुके हळूवार विरत चालले...! 

- अनुजा विजय कारंडे #नंदादीप