Nojoto: Largest Storytelling Platform

सर्व संपले असताना, मी गेल्यानंतर जिवंत काव्य धार

सर्व संपले असताना, मी गेल्यानंतर जिवंत काव्य धारा |
तोच माझ्यासाठी सुखाचा आणि आनंदाचा वेगळा वारा ||

जगातून गेल्यानंतर काव्य विचारांची धार कायम असावी |
मी गेल्यानंतर माझी काव्यवेल जगात प्रवास करणारी असावी||

काव्य जिवंत असणे तेच माझे अस्तित्वाची जाणीव |
पूर्तता झाली म्हणजे माझ्या मनात नसणार कोणती उणीव ||

जगण्या-मरण्याचा या प्रवासात कोण कधी पाहुणा होणार |
मी गेल्यानंतर माझ्या कविता जिवंत असणार ||

सर्व काही संपले असताना ,देखील माझ्या कविता कोणीतरी जगणार |
आयुष्याच सार वेगळं ,आनंद मनी, माझं समाधान असणार ||

मुखातून कवितेचा ओळी म्हणजे माझे स्मरण |
देहाने जरी नसली मी, तरी कवितेतून माझे स्मरण ||

सर्व काही संपले असताना, मी कवितेतून बोलत राहीन |
भावनांचा पसारा मी सतत मांडत राहीन ||

सर्व संपले असताना ,कागद लेखणीची ऋणी राहीन |
भावनांचा खेळ ,मांडण्याचा मेळ तुमचा प्रेरणादायी राहील ||
- ✍️शितल कैलास गुर्जर✍️

  सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
सर्व संपले असताना...
#सर्वसंपलेअसताना
हा विषय
Yogesh Ambawale यांचा आहे.