#चालतो इथं मुकेपणानं जगण्याचा सोपस्कार.. चुकली कैक गणितं तरी अन् हरवल्या पायवाटा मुक्यानं जरी तरी इथं चालतो मुकेपणानं जगण्याचा सोपस्कार किती जाहली ती शकले मनाची सहसा न उकल होई हृदयीच्या त्या हजारो गुंत्यांची त्यागली सुखास्वप्नांची शुभरत्ने ती फुकाची आसवांना सापडेना किनारा जरी तरी इथं चालतो मुकेपणानं जगण्याचा सोपस्कार उडून जाई अनाहुतपणे कधी सोबतीचा पक्षी उरे फक्त आता त्या सुरेल आठवांची नक्षी नक्षीला त्या नसे कारीगरी सुंदरतेची जरी तरी इथं चालतो मुकेपणानं जगण्याचा सोपस्कार शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #आयुष्याचे_पुस्तक