तोच जुना रस्ता आता दिसतो गजबजलेला ना ती भयाण शांतता ना ती सुखद त्या वट वृक्षाची सावली ना कुणाची वाट पहायची जिथे कुणी चिट पाखरू पण फिरकत नव्हते ! आता भरून वाहतोय माणसांनी ! पण खरा माणूस तोच कुठेतरी हरवलाय ! शोधतोय माणूस याच रस्त्यावर जो येता जाता राम राम करणारा ! प्रेमाचे दोन शब्द विचारणारा ! आपला माणूस मायेने चौकशी करणारा ! तोच जुना रस्ता झालाय अनोळखी येथे आता कोणी कुणाला विचारत नाही जो तो फक्त आपल्याच विचारात मग्न असणारा ! तोच जुना रस्ता जिथे शपथा घेतल्या चोरून आलिंगने दिली घेतली प्रेमात आकंठ बुडालो तोच जुना रस्ता आता कुठेतरी हरवलाय !!! *** प्रकाश साळवी बदलापूर - ठाणे मोबा. ९१५८२५६०५४ तोच जुना रस्ता !