...मनाची गुरफट.. मनाशी विमुक्त संवाद की विचारांची घुसमट स्वतःशीच अंतःकरलेली असते ती आयुष्याची फरफट.. अहंकाराचा डौल की गर्वाची मुसंडी.. समाधानाशी केलेली कुचेष्टा ती मनाने मनाला दिलेली हीच ती कबुली.. क्षणात धरते ती चित्याची चपळाई घुसळून घुसळून त्याची त्यालाच कीव येई.. परि डोकेदुखी शिवाय पदरी त्याच्या पडे ना काई नवयुगातील मनाची हीच म्हणावी पुण्याई.. तुला सामोरी जाण्यापरी मृत्यू ही बरा.. तुझी घुसमट , तुझी घालमेल खूप बोचतीय मनाला.. ये येड्या मना या जिंदगीला फक्त पुरत नाही रे पाठीचा कणा तुझ्या निर्मळतेने खऱ्या अर्थाने तो ताठ होईल रे पुन्हा.. तो ताठ होईल रे पुन्हा.. -abhi #मराठीकविता #मन #Soul #मायमराठी #Talk #meltingdown