भिनलाय हा वारा अंगा येई शिरशिरी प्रीत गुलाल उधळून चित्ती होई बावरी मधुर स्वर कोकिळेचे कुठून पडतेय कानी हृदयातून स्फुरू लागली मिलनाची गोड गाणी अंबर आणि धरा ही डोलती आज मजसवे काळजास स्पर्शती सर्द हवेचे गुलाबी थवे तपतेय ही काया जणू आस तुझी लागे जीवा एक होऊनी दरवळ होऊ उषेःचा लावू दीप नवा नमस्कार लेखकानों💕 सुप्रभात. आजच्या दिवसाची सुरुवात प्रेमापासुन करुयात. आज पासुन प्रेमाचा महिना सुरु झालाय. तुम्हाला ही जिकडे-तिकडे प्रेमाचा वारा वाहतांना दिसेल,मग त्या वार्यात आपण पण वाहुयात. आजच्या विषयावर प्रेमकविता करुयात. आजचा विषय आहे प्रेमाचा वारा...