रक्षाबंधन खूप प्रेमळ असते आपल्या बहिणीचे मन, भावाचा जिव्हाळा म्हणजे तिच्यासाठी धन. भाव सतत करत असतो आपल्या बहिणीचे रक्षण, या सर्वांचे मिलन म्हणजे असते रक्षाबंधन. बहिणीस नसते भावाकडील संपत्तीची अपेक्षा, आपला भाव चांगला राहो एवढीच तिची इच्छा. भाव बहीण मिसळून खातात पदार्थचा कण, या सर्वांचे मिलन म्हणजे असते रक्षाबंधन. या दिवशी बहीण भावास बांधते एक राखी, तिला वाटते आपला भाव राहो नेहमी सुखी. हा असतो त्यावेळी एकप्रकारे सण, सर्वांचे मिलन म्हणजे असते रक्षाबंधन. या दिवशी बहीण भावाच्या नात्याला असते महत्व, भावाने बहिणीस भेटवस्तू द्यायची लोकांचे आहे तत्त्व. रक्षाबंधन असतो एक सुखाचा क्षण, या सर्वांचे मिलन म्हणजे असते रक्षाबंधन. -हर्षल दत्तात्रय चौधरी #rakhi #raksha #bandhan #rakshabandhan