निघालो आहे मी काम एक करण्या सुरुवात त्याची मी कधीची केली आहे, जाताना पोटात नाही कण ही अन्नाचा काल च्या पाण्याने पोट भरून आहे, आहे एका नंतर कित्येक घर मागायचे किती जणांच्या द्वेषाला होते गिळकृंत करायचे, गेलो एका घरी मागितले काकुळतेने रागाच्या त्यांच्या पाऱ्याने आधीच हाकललेले, डोक्यावर आहे भर-ऊन चालतो अनवानी शिळा तुकडा झोळीत टाकेल का कोणी, दम घेण्यासाठी बसलो झाडाची सावली पाहुन रस्त्यावरून गेलेत काही नाणे कटोरीत टाकून, डोळ्यात येतेय गुंगी चढली आहे अंधारी भाकरीच्या आशेत जगणारा...........मी असा भिकारी ©Lina Kirnapure भाकर......