श्रावण आला ... बिथरली कोवळी झाडे-झुडपे रिमझीम पाऊस पानांवर बरसता खळ-खळू लागले ओढे नाले श्रावण खुदकन गाली हसता लपंडाव चालू ऊन पावसाचा टपोरा थेंब-थेंब इंद्रधनू झाला फुलवूनी मोहक मयूर पिसारा श्रावण आला श्रावण आला आगंतुक ही सणासुदीला खमंग सात्विक पूर्नान्नाची करता पूजापाठ आराधना भेटे गुरुकिल्ली जीवनाची बहरली हिरवी दाट छाया सजले सारे डोंगर कपार रूप देखणे जणू शब्दातीत श्रावणमास महत्व अपार. प्रयाग पवार वाघवाडी परळी सातारा ©prayag pawar #Shravan #poem #trending #trendingnow