पुस्तकांनी मला छळले आहे. शांत डोहात कित्येक तरंग छेडले आहे. बरा होता साचलेल्या डबक्यासारखा समुद्राचे स्वप्न दाखवून ढवळले आहे. माझ्यातच मी व्यस्त होतो; दोन घास खाऊन मस्त होतो. उगाच पुस्तकांची साथ धरून प्रगल्भ होण्या अस्वस्थ होतो. पुस्तकांनी मला एकटं कधी पडू दिलं नाही. गर्दीत असलो तरी साथ कधी सोडली नाही. पुस्तकांनी आयुष्यात खूप भूमिका साकारल्या आहेत. नको-नको म्हणतांनी अनेक वाटा दाखविल्या आहेत. विचारांची गतीचक्रे वाढवून सतत मग्न ठेवले आहे जीवंतपणाची सर्व लक्षणे दाखवून अनेक पैलू उलगडले आहे. #पुस्तकं