झाडे उत्तमप्रकारे टिकून राहण्यासाठी, जसे त्याच्या मुळाशी खोलवर ओलावा लागतो पाण्याचा. तसेच उत्तम काव्यलेखन करण्यासाठी, त्याच्या मुळाशी ओलावा हवा असतो शब्दांचा. साधारण शब्द हे नुसतेच काव्य करते, जे काही काळात विस्मरणात जाते. उलट ज्या काव्यलेखनाला शब्दांचा ओलावा असतो, ते काव्यलेखन अविरत रुची देत,वाचनाची आवड निर्माण करतो. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीतीय ना?? आजचा विषय आहे ओलावा हवा असतो शब्दांचा... #ओलावा तुमच्या अप्रतिम प्रतिसादासाठी तुमचे मी आभार मानते. असचं लिहीत राहा.