Nojoto: Largest Storytelling Platform

#हे सुदर्शन चक्रधारी गोविंदा...... आजच्या काळात खऱ

#हे सुदर्शन चक्रधारी गोविंदा......
आजच्या काळात खऱ्या बासरीचे सूर हवेत विरले अन् कानाचे पडदे फाटले जाऊन डीजेदेखील सैराट झाले
कृष्णाच्या हयातीत रासक्रीडा वृंदावनी रंगताना मर्यादा होती आज काल चक्राच्या ओघात
मात्र रासलीलेत इथे तिथे फक्त कंसच माजत आहेत
अन् तरीही हे सुदर्शन चक्रधारी गोविंदा तू एका दिवसापुरता फक्त जगास दाखवण्याकरीता आहेस मनात आमच्या......
तुच तुझं अस्तित्व होतं तेधवा गोवर्धन करंगळीवर तोलून रक्षीलेस जनतेला
पण आज मात्र ओसाड माळरानी आम्हीच लटकविले आमच्या जन्मदात्यास फासाला
कालियामर्दन करून तुच देवा तेव्हा यमुनेस मुक्त केले आज मात्र त्याच तुझ्या पदस्पर्शान पवित्र झालेल्या पाण्यास रसायनाने आम्हीच रंगविले
अन् तरीही हे सुदर्शन चक्रधारी गोविंदा तू एका दिवसापुरता फक्त जगास
दाखवण्याकरीता आहेस मनात आमच्या......
अवघड असे ते चक्रव्यूह भेदण्याचे तंत्र फक्त तुलाच अवगत होते
तेच तुझे ते अचाट शक्तीयुक्त तंत्र रेल्वेच्या दारात ग्रुपमध्ये उभं राहण्यासाठी अन् गरज नसताना भर ट्रॅफिकमध्ये नियमांची मोडतोड करून स्वतःचा स्वार्थ साधण्या आम्ही अवलंबिले
तुच तुझे सैन्य दुर्योधनास देत सारथ्य त्या महावीर अर्जुनाचे तु स्वीकारलेस आम्ही मात्र आमचाच
मी पणा मोठा करून सदा जीवनयुद्ध हे आमचेच हरत राहून आम्हालाच अपयशी जगताना पाहीले
अन् तरीही हे सुदर्शन चक्रधारी गोविंदा तू एका दिवसाकरीता फक्त जगास
दाखवण्याकरीता आहेस मनात आमच्या......
तु दही दुधाचा माठ निस्वार्थ भाव मनी ठेवून स्वत:च्या सर्व सोबत्यासाठीच फोडीला होतास
आज मात्र तोच माठ मानाची हंडी बनुन त्यावर स्वार्थरुपी प्रसिध्दीचा थर थरावर रचण्याच्या चढाओढीत
त्या गोपाळकाल्याचा मूळ हेतूच हरवला आहे
तुझे अस्तित्व फक्त सोळा सहस्त्र बायका होत्या हेच लक्षात राहिले अन्
तुझा तो निष्काम कर्मयोग मात्र आज गीतेत कायमचा बंदिस्त आहे
तेव्हाचे तुझे ते गोधन मोरपीस पावा विसरून आता आजच्या स्टाईलीश राधेचेच गुणगान होत आहे
अन् तरीही हे सुदर्शन चकधारी गोविंदा तू एका दिवसाकरीता फक्त जगास दाखवण्याकरीता आहेस मनात आमच्या.......
सूर तुझ्या ओठी मुळ स्वरूपातच होते की ही त्या मधुर बासरीच्या छिद्रांची अनोखी कमाल होती
आज मात्र आमची देहअपी बासरी राग द्वेष मत्सराने बेसूर वाजत आहे
तु असताना देवा तुझे ते सुदर्शन चक्र दुष्टांचे निर्दालन करीत होते
पण आज तुझ्या त्या मधुर बासरीतुन फुलणाऱ्या विश्वसुखप्रार्थनारुपी
सुदर्शनचक्राचे सूर जगी फक्त स्टाईल म्हणूनच मिरवले जात आहे
अन्
तरीही हे सुदर्शन चक्रधारी गोविंदा तू एका दिवसाकरीता फक्त
जगास दाखवण्या करीना आहेस मनात आमच्या.......
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #कृष्ण_जन्माष्टमी