वाट ती सरळ जाणारी, पुढे जाऊन दोन वळण घेणारी. आज पुन्हा वाटेवरती त्या जाऊन आलो, विसरलेले ते प्रेमाचे क्षण पुन्हा आठवून आलो. नियमित भेट दोघांचीही त्याच वाटेवरती व्हायची, येता वळण मी माझ्या वाटेला तर तू तुझ्या वाटेला जायची. सुट्टी होती त्या दिवशी,तरी सहजच आलो पाहिले तुला नि आनंदीत झालो. सवय झाली आता दोघांना तिथेच भेटण्याची, जाता आपआपल्या वाटेला काही क्षण पुन्हा मागे वळून पाहण्याची. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? मस्त ना... चला तर मग या विषयावर लिहुया. आजचा विषय आहे वळणावर त्या... #वळणावरत्या हा विषय Swapna V. Kulkarni यांचा आहे.