थोड्याश्याच या सहवासात खुप आठवणी दडून बसतात आयुष्यातला हाच सहवास हृदयात घट्ट मिठी मारून असतात सहवास तो कधी असतो गोड तर कधी शिकवण देवून जाणारा सहवासाच्याच शिकवणीतून खुप काही शिकवून जाणारा गोड असतो तो सहवास गोडवा देऊन जाणारा गोड माणसांच्या आठवणींचा हृदयात ठसा उमटवून देणारा सहवास आयुष्याचा नसतो असा सारखा कारण प्रत्येक जण असा नसतो आपल्या मनासारखा सहवास तर तो सुखाचा असावा प्रत्येक जण आपल्या वाट्याला येणारा असावा खुप काही शिकवून जाते प्रत्येकाची बोली बोल काहींचे हृदयाला लागतात तर काहींचे हृदयात येऊन बसतात सहवासातल्या क्षणांचा चित्रपट हा चालूच असतो म्हणूनच आपण सहवासातून खूप काही शिकतो......... friendship