Nojoto: Largest Storytelling Platform

भूतकाळ ... हृदयाच्या तळाशी गाळ होऊन बसलेलं दुःख कध

भूतकाळ ...
हृदयाच्या तळाशी गाळ होऊन बसलेलं दुःख कधी माझ्या लेखणीचे शब्द होऊ झालं समजलंच नाही लिहिताना हात थरथरत होते मन भटकंती करायला भूतकाळात गेल होत, आणि काळीज धडधडतही होतं ते भीतीमुळे नव्हे तर दिवसाला रात्र आणि लाव्याला घाम सोडू पाहणाऱ्या आठवणीमुळेच होय. आज खोलीत दोन बल्ब चालू असूनही मला माझ्या आयुष्यात अंधार दिसत होता आज पुन्हा एकदा चांदण्याने भिजलेल्या आसमंताच्या छताखाली मी झोपू पाहत होतो आज पुन्हा एकदा गवताने पिंजलेल्या हिरवळीवर काळ्या आयुष्यात गुलाबी ईर्शाळ हवेत मी झोपु पाहत होतो. मला पुन्हा उन्हाळी माळावरच्या मोकळ्या जमिनीवर देह रोवून मइनेच्या स्वप्नात निद्रस्त व्हायचं होतं, पण अचानक खोलीचा दरवाजा खटखटला आणि काळ्या भूतकाळच शुभ्र स्वप्न मला चाहूल देऊन पुन्हा आठवणीच्या ओझ्यात काळ पडलं.
                                                                  
                               -Kartik Sanjay Choure

©Kartik Choure
  #marathi