पडक्या भिंती पडक्या भिंतींनाही आहे अजुनी ओलावा मायेचा पाहता काळीज तुटत जाते आवाज येतो आईच्या हाकेचा गावाकडची मातीच न्यारी हृदयांना घट्ट सांधणारी नसेल कुठले नाते तरीही आपुलकीने मने बांधणारी सय आजीच्या गोधडीची हवासा खजिना गोष्टीचा खाऊ देताना माझ्यासाठी थरथरणारा हात मायेचा आठवते हिवाळ्यातली आगटी गप्पांचा फड उभारणारी आणि उब आईच्या कुशीची वत्सलतेने मज बिलगणारी आधारवड माझ्या बाबांचा घराचा डोलारा तोलणारा क्षणोक्षणी आठवत रहातो पाठीवर हात फिरणारा पाहता पडकी भिंत आजही दृश्यपट तो उभा राहतो एकेकाळच्या नंदनवनाची आजही तो साक्ष देतो #nojoto#nojotoapp#nojotomarathi#marathikvita#nojotopoem#nojotohindi#nojotonews#nojotobestpoetry