सतारी चांद खुडून ठेवला बुबुळाच्या देठावर आळवला मालकंस तिने मुक्या ओठावर कुणी काळीज काठाने दिला सोबत पहारा लाट सुनामी झाल्यावं नदी शोधते किनारा लाज लाजते लाजेला कुठे लपवावा डोळा पैंजनाच्या चाहुलीने जीव होतो येडाखुळा रात पेंगत चालली कूस झाली भरजरी जिथे विसावले श्वास तिथे वाजल्या सतारी -विष्णू थोरे,चांदवड. ©vishnu thore सतारी चांद खुडून ठेवला बुबुळाच्या देठावर आळवला मालकंस तिने मुक्या ओठावर कुणी काळीज काठाने