मनोगत... जरा वेळ काढून, बस एकटाच स्वतःसोबत.. दुसर्यांचा विचार सोडून दे, ऐकून घे स्वतःच मनोगत... तू असा बसल्याने, काहीच थांबणार नाहिये.. तसचं सुरु राहील, जसं सुरू होतं सारं जगत... तुला काय वाटतंय, जीवनाची काय कमाई झाली.. कुणाचं हृदय प्रसवलं, कोण कुणाची आई झाली... काही नाही झालं रे, बाळ जन्मले अन बाळ गेले.. असे कित्येक कोष न उमलता, अळीच राहून मेले.... अळी फक्त वळवळते, फुलपाखरा सारखं उडणार नाही.. कोशात राहून पोषण होईल, पण जगाचं दर्शन घडणार नाही... जगाची फिकीर सोडून, जरा स्वतःच्या जिंदगीची गोळाबेरीज कर.. मरताना हृदयात आनंद राहील, असा हातचा ह्रदयी धर.. Vishaal/Aadinaath 05-07-2021 . ©Vishal Chavan #मनोगत #seashore