Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेम मी रे जाणले.. मी वाहत गेले काळीज अन् काळजीत

प्रेम मी रे जाणले..

मी वाहत गेले काळीज अन् काळजीत पडले
पंख माझेच विहरणारे काळजीने मी खुडले

वार होत असता चित्तावर चित्त होते थरथरले
काळीज दाटून नयनात अश्रूतून झुरझूरले

काय चुकले माझे की मी माझेपण अर्पिले
पाषाण ह्रदयी असणाऱ्याला शेंदुराने सजविले

घाव बसता घावावर हाक तरी निघावी कशी
निपचित पडून वेडे सत्त्व घेत असे वामकुक्षी

ह्रदया तुझ्या कारणे मी काय काय सोसले
शब्द आग ओकताना रे कुठले देऊ दाखले

एक बरे जाहले मला वेडीला प्रेम रे घावले
काळजाला काजळवणारे प्रेम मी रे जाणले.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor
  #outofsight प्रेम मी रे जाणले..

मी वाहत गेले काळीज अन् काळजीत पडले
पंख माझेच विहरणारे काळजीने मी खुडले

वार होत असता चित्तावर चित्त होते थरथरले
काळीज दाटून नयनात अश्रूतून झुरझूरले

#outofsight प्रेम मी रे जाणले.. मी वाहत गेले काळीज अन् काळजीत पडले पंख माझेच विहरणारे काळजीने मी खुडले वार होत असता चित्तावर चित्त होते थरथरले काळीज दाटून नयनात अश्रूतून झुरझूरले #शायरी

297 Views