*गढूळ झाले तळ मनाचे* *आटून गेले नितळ झरे* *ओलं सरता उरल्या भेगां* *खोल उमटले घाव,चरे..!* *रणरणणाऱ्या उन्हांत आता* *झुळूक हरवली कुठेतरी* *पदोपदी पेरले निखारे* *फुंकर भासे दाह परी..!* *आपल्याच जखमां कुरवाळीत* *किती दिलासे उसने,खोटे* *लपेटली जरी भळभळ ओली* *सल मनाची मनांत दाटे..!* *भार वाहूनी झाडं ही थकले* *ऋतू बदलले काळ ओसरे* *सुने घरटे काय उरले?* *पंख फुटता दूर पाखरे..!* *काय भरवसा फिरुनी येतील?* *कोसळल्यावर टिपे गाळतील?* *उन्हं जगाचे चटके देईल* *पंखाची उब शोधत बसतील..!* ©Shankar Kamble #Foggy #गढूळ #तळ #माया #प्रेम #वेदना #वेदनांचागाव #काठावर