पहिल्या lockdown मध्ये मजुरांनी खूप खाल्यात खस्ता म्हणून आता lockdown होण्या आधीच धरला घरचा रस्ता कडक झाले निर्बंध महाग झाली सर्व मालमत्ता सामान्य माणसाने सांगा जगायचे कसे आत्ता सामान्य माणसाने बाहेर पडून कोरोना होऊन मरावे की घरात राहून कुटुंबाला उपाशी मरताना बघावे काय झाला गुन्हा म्हणून एक विषाणू असा कोपला की देवळातील देवच आज माणसांवर रुसला आधीच सर्वांनी खूप सोसलाय लॉकडाउनचा भार आता तर वाणी सुद्धा देत नाही किराणा उधार मरावे की जगावे हा प्रश्न मनाला भेडसावतो किती पाहतो देव अंत की आता जीव घेऊनच सोडतो कोरोनाचा कहर#मराठी कविता#