*विषय:-रिती ओंजळ* *मुक्तछंद काव्य* *दिनांक :-१८/०१/२०२१* ********************* संपत्तीच्या जोरावर खुप काही *मिळाल,* समोर असूनही मी सार काही *गमावलं.* माझीच माणसे होती नितांत प्रेम *करणारी,* धनदौलतिच्या नादात आपलेपण *विसरणारी.* प्रत्येक वेळी फक्त माझाच स्वार्थ *पाहिला,* रक्ताच्या नात्यामध्ये मी आरोष सारा *ओढावला.* माझ्या संकट काळात सतत सगळे पळत *होते,* पण माझ्या डोळ्यांवर अहंकाराचे मळभ *होते* सगे सोयरे प्रत्येकवेळी माझाच विचार *करी,* पण स्वभाव दोषापायी मन वेगळाच विचार *धरी,* आज साऱ्यातल सार आहे पण माझी माणसेच *नाही,* गतकाळातील चुकीमुळे रिती ओंजळ रिकामी *राही.* ------------------ *✍️ राजेंद्रकुमार शेळके.* -- नारायणगाव, पुणे. ©Rajendrakumar Shelke रिती माझी ओंजळ #Wish