माणसांच्या गर्दीतली वचने की वचनांच्या गर्दीतली माणसे, कुणी शोधुन देईल का मला वचने पुर्ण करणारी माणसे, वास्तववादी आयुष्य मी आशावादी अंधश्रध्दाळु लोकांसोबत जगत असतो, प्रेम,माया ,नाती अशा जळुण गेलेल्या गोष्टींची ऱाख सोबत घेऊन मी दुनियेकडे बघत असतो फेकलीच कुणी धुळ डोळ्यात तर निराश का व्हायचं? फसवणारीही ती माणसेच अन हसवणारीही ती माणसे कुणी शोधुन देईल का मला वचन पुर्ण करणारी माणसे माणसांच्या गर्दीतली वचने की वचनांच्या गर्दीतली माणसे कवी: संदेश तुकाराम घारे वचने