Nojoto: Largest Storytelling Platform

अरे तू एक मुलगा आहेस तू आमच्यासारखं रडू शकत नाहीस

अरे तू एक मुलगा आहेस तू आमच्यासारखं रडू शकत नाहीस जरी तुला त्रास असेल तरी कारण एक मुलगा आहेस तुझ्यावर कितीही जबाबदारी आल्या तरी सुद्धा तू कोणाला ते सांगू शकत नाहीस कारण मुलगा आहेस आम्हा मुलींचे बरं असतं आम्ही रडून मोकळ्या होतो आणि आम्हाला आधारही मिळतो पण तुम्हा मुलांचं तसं नाही ना तुम्ही एकटेच बसता झुलत आणि तुम्हाला कोणी विचारत पण नाही आणि मग तुम्ही आता शोधा तुम्हाला खूप दुःख होतं ते दुःख कोणाला सांगू शकत नाही आणि जर सांगितलं तर ते कोणी तुमचं ऐकूनही घेणार नाही बाबा गेल्यानंतर माझ्यावर मुलगा म्हणून आई खूप मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी टाकली होती वयाच्या दहाव्या वर्षापासून मी कामाला सुरुवात केली मुलगा म्हणून मी कुठे चुकलो नाही माझ्या जबाबदाऱ्या माझ्या परीने मी सांभाळत आलो तरीसुद्धा मलाच बोलतात सगळे कारण मी एक मुलगा आहे सगळ्या जबाबदारी मुलांनाच का तर तू एक मुलगा आहेस म्हणून वंशाचा दिवा मग तुझ्या भावना तुझं कोणावर असलेलं प्रेम ह्या सगळ्या गोष्टी विसरून फक्त आणि फक्त फॅमिलीसाठीी जगायचं मी कधी स्वतःसाठी जगलोच नाही पण आता मी ठरवलं की मी आता फक्त स्वतःसाठी जगणार आहे त्याच्यात मला परमेश्वराची साथ आहेच तो करेल सगळं ते मला माहित आहे जरी मी एक मुलगा असतो तरी मुलाला सुद्धा मन असतं भावना असतात त्याला पण कोणावर तरी प्रेम करावसं वाटतं त्याच्यावर कुणीतरी प्रेम करावे असे त्याला वाटतं पण एक जबाबदारी असते म्हणून तो त्या गोष्टी करू शकत नाही मी शरीराने जरी अपंग असलो ती मनाने मी अगदीच खंबीर आहे असं मन अपंग नाही माझ्या हृदयात किती दुःखाचा डोंगर असला तू दुःखाचांगर कधीच कुणाला सांगत नाही आणि मग दुःख सांगायचं तरी कोणाला कारण माझं मन कुणी समजूनच घेत नाही मी जर एक मुलगा असतो तरी वैभव ठाकरे

©Vaibhav Thakre
  मुलाची व्यथा मांडणारे एक हृदयस्पर्शी कथा

मुलाची व्यथा मांडणारे एक हृदयस्पर्शी कथा #जीवनअनुभव

27 Views