नाही व्हायचंय मला इतकं श्रीमंत ज्याने माझी माणसं मला दिसणार नाही पैशांनी माजलेल्या माझ्या चेहऱ्याकडे बघून माझीच माणसं प्रेमाने हसणार नाही... नाही व्हायचंय मला इतकं श्रीमंत जिथे एका घरात चेहऱ्याला चेहरा दिसणार नाही नकोत मला गर्वाच्या भिंती घरात जिथे सुखदुःखात माझी माणसं मला दिसणार नाही... नाही व्हायचंय मला इतकं श्रीमंत जिथे मला माझ्या सुखासाठी वेळ असणार नाही गाडी,बंगला,पद,संपत्ती,चमचे सारे काही असणार पण माझ्यात मीच असणार नाही... आयुष्यात प्रेम करणारी माणसं हवीत मला त्याशिवाय जगणं कधी कळणार नाही पैसे कमावण्याच्या नादात जगणं विसरलोय असा आयुष्य परत मिळणार नाही... झोपडीतील चटणी भाकरीचे सुखाचे दोन घास बरे पण दगदगीचे महालातील पोटभर जेवण नकोसं असणार हातात हात अनं जीवाला जीव देणारी एक सोबती हवी बस बाकी आनंदी जगण्यासाठी आयुष्यात काय हवं असणार? ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) motivation shayari motivational thoughts on life