Nojoto: Largest Storytelling Platform

नवलाई नवी पण गंध आहे जुना नाव माझे जिथे मी बसू का

नवलाई नवी पण गंध आहे जुना
नाव माझे जिथे  मी बसू का पुन्हा
वर्ग मित्र सारे अनोळखे इथे झाले
प्रश्न मनी त्याच्या तू आलास का रे?

अलगत उतरतो त्या मी वर्गात जुन्या
मिसळून जातो जणू स्वर्गात पुन्हा
                              स्वर्गात पुन्हा

कविता नवी पण ताल आहे जुना
होऊनि पुढे मी हि म्हणू का पुन्हा
शब्द मात्र सारे इथे अनोळखे झाले
प्रश्न मनी त्याच्या तू आलास का रे?

चाळतो सर्व पाने त्या मी वर्गात  जुन्या
मिसळून जातो जणू स्वर्गात पुन्हा
                           स्वर्गात पुन्हा

आठवेल तुलाही हि सोडशील जागा
खंतावेल उद्या हा आजचा तुझा त्रागा
तितक्यात जाग येते अंधार  दूर होते
प्रश्न मनी माझ्या मी इथे नव्हतो का रे?

आठवतो सर्व रस्ते जायचे त्या वर्गात जुन्या
मिसळून जातो जणू स्वर्गात पुन्हा
                        स्वर्गात पुन्हा
रोशन देसाई 
29।03।20 स्वर्ग आहे जुना
नवलाई नवी पण गंध आहे जुना
नाव माझे जिथे  मी बसू का पुन्हा
वर्ग मित्र सारे अनोळखे इथे झाले
प्रश्न मनी त्याच्या तू आलास का रे?

अलगत उतरतो त्या मी वर्गात जुन्या
मिसळून जातो जणू स्वर्गात पुन्हा
                              स्वर्गात पुन्हा

कविता नवी पण ताल आहे जुना
होऊनि पुढे मी हि म्हणू का पुन्हा
शब्द मात्र सारे इथे अनोळखे झाले
प्रश्न मनी त्याच्या तू आलास का रे?

चाळतो सर्व पाने त्या मी वर्गात  जुन्या
मिसळून जातो जणू स्वर्गात पुन्हा
                           स्वर्गात पुन्हा

आठवेल तुलाही हि सोडशील जागा
खंतावेल उद्या हा आजचा तुझा त्रागा
तितक्यात जाग येते अंधार  दूर होते
प्रश्न मनी माझ्या मी इथे नव्हतो का रे?

आठवतो सर्व रस्ते जायचे त्या वर्गात जुन्या
मिसळून जातो जणू स्वर्गात पुन्हा
                        स्वर्गात पुन्हा
रोशन देसाई 
29।03।20 स्वर्ग आहे जुना
roshan3636889878453

roshan

New Creator