एक स्त्री... सुखरूप यावं त्यानं देवाला पुजते. नको नात्यात दुरावा सदा नाव त्याचं जपते. कधी होतो तो कृष्ण मी वेडी राधा बनते. पहावं नयनात त्यानं घडी घडीला सजते. न्याहाळता मला त्यानं त्याच्यात हरवून जाते. सागर तो माझा मी त्याची नदी होऊन वाहते. मी सखी त्याची अस्तित्त्व माझं त्याला मानते... #प्रेम #स्त्री #कविता