आयुष्य तुझं माझं तेच आहे श्वास अडखळले तरी घेत आहे पाऊलवाट गीत गात होती वसंतापरी गंधमत्त मोगऱ्याची स्पंदने मंदावली होती बहुदा तुझ्यामाझ्या चांदण्याची प्रीत शापित होती आयुष्य तुझं माझं तेच आहे वेदनांचे आलाप सुखाने पांघरत आहे चंद्रज्योती गंध गारवा उधळत होती समर्पणाचा केशरी निशिगंध पेटूनही विझत होता बहुदा तुझ्यामाझ्या सुखसोहळ्यास क्रूरता डसली होती आयुष्य तुझं माझं तेच आहे भंगलेल्या स्वप्नांना कुरवाळत आहे शिणलो जरी जीवनाला झेलताना मौत्तिक आसवं दिली तू आणि मी ह्या कळ्यांना, पाकळ्यांना अन फुलांना बहरायला स्वप्नं पाहू लागलो पुन्हा एकदा उमलतांना बहुदा जिद्द नाही संपली अद्याप आपुली वादळांशी झुंजताना #NojotoQuote आयुष्य तुझं माझं तेच आहे श्वास अडखळले तरी घेत आहे पाऊलवाट गीत गात होती वसंतापरी गंधमत्त मोगऱ्याची स्पंदने मंदावली होती बहुदा तुझ्यामाझ्या चांदण्याची प्रीत शापित होती आयुष्य तुझं माझं तेच आहे वेदनांचे आलाप सुखाने पांघरत आहे चंद्रज्योती गंध गारवा उधळत होती