Nojoto: Largest Storytelling Platform

पुरुषत्व कशाला म्हणायचं? देहयष्टीचा रूबाब तिच्यावर

पुरुषत्व कशाला म्हणायचं?
देहयष्टीचा रूबाब तिच्यावर
मूठभर मांस जास्त म्हणून येताजाता घाव तिच्यावर
आवाजात किंचित वरचा सूर देवानं दिलाय म्हणून 
मुस्कटदाबी खोटा दरारा तिच्यावर
प्रत्येक गोष्टीत अशा पुरुषांचं पौरुषच व्यय, वरचढ दाखवण्यावर
तिची कामना करणारं, मनोकामना मारणारं पुरुष जनावर
'करतो' या उपकाराखाली कर्तेपणाचा आव अनावर
दरारा, बडेजाव, मर्दानगीचा गर्व, अधिकारवाणीत अपशब्दांचा भडीमार 
ह्यातच पौरुषत्व बेअसर
स्वयंघोषित *हेड ऑफ द फॅमिली*, *द फॅमिली मॅन* 
होईल कधीतरी ती मात्र आजही आशेवर

मग पुरुषत्व कशाला म्हणायचं?
देहबोलीतून सुद्धा नम्र विचार 
तिचं अस्तित्व मान्य, समांतर आचार
तिच्या सुरात सूर मिसळून, बेसूर का होईना जीवनगाणे साकार
गृहसौख्य तिच्या असण्यानं लाघवी ती सर्वस्वी जबाबदारी स्वीकार
घराला घरपण अन स्वयंपूर्ण अर्पण करण्यात ती तत्पर
अशा *ती* चा तिच्या *स्त्रीत्वाचा* सन्मान हाच खरा पौरुषत्वाचा अधिकार
कष्टातून कर्तव्य समजणारं, काळजीतून काळीज उमजणारं व्यक्तिमत्व
 हेच खरं *पुरुषत्व* स्त्रीत्वाला आधार

परिस्तिथी काहीही असो, पुरुष कोसळतो #स्त्री मात्र खंबीर,
 न खचणारी भिंत जणु, वादळवाऱ्यातही समेटून घेते घरं
तिनं सावरलेल्या, आवरलेल्या, सारवलेल्या प्रत्येक कानाकोपऱ्यावर
 तिचं अस्तित्व मान्य, तेच #पुरुषत्व खरं #rayofhope #stopdomesticviolence #respect_women #respectpartner #Life #be_a_man

kiransuryawanshi5940

rayansh

New Creator