वाईट आज दिसतो, आधी भलाच होतो ! निष्पाप अन् निरागस झुलता झुलाच होतो ! प्रत्येक माणसाने दिधला दगा मनाला स्वार्थात गांजलेल्या गावातलाच होतो ! भिक्षेकरी म्हणा मज आश्चर्य त्यात नाही मी आळशी जनांच्या शहरातलाच होतो ! रत्नास उर्मटाची बाधा कशी जहाली गर्वात माळलेल्या माळेतलाच होतो ! झालो उगाच नाही स्थितप्रज्ञ आजच्याला आगीत पोळलेल्या चटक्यातलाच होतो ! सतीश देशमुख ©Satish Deshmukh वाईट #Missing