Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेमाची चाहूल....💓💓💓 तू असल्याचा भास सारा, मृ

प्रेमाची चाहूल....💓💓💓
तू असल्याचा भास सारा, 
मृगजळाच्या लाटा होती वारा. 
नाही भान कशाचे तू असताना, 
व्यर्थ सारे आता काही तुझ्याविना. 
आयुष्यातील सुंदर भेट तू, 
आठवणींची प्रीत जाई मग ऊतू. 
उन्हाचा ही भास नसे  तू सोबत असताना, 
सुखद क्षणांचा गारवा ही आता सोसवेना.
हा रस्ता सारा वेगळाच मनास वाटे,
नाही माहित जाईल तो पुढे अन् कुठे. 
हीच प्रेमाची चाहूल आयुष्यभर बहरूदे,
नात्याच्या बंधात एकमेकात गुंफूनी ती फुलू दे.

©Mayuri Bhosale #प्रेमाची चाहूल
प्रेमाची चाहूल....💓💓💓
तू असल्याचा भास सारा, 
मृगजळाच्या लाटा होती वारा. 
नाही भान कशाचे तू असताना, 
व्यर्थ सारे आता काही तुझ्याविना. 
आयुष्यातील सुंदर भेट तू, 
आठवणींची प्रीत जाई मग ऊतू. 
उन्हाचा ही भास नसे  तू सोबत असताना, 
सुखद क्षणांचा गारवा ही आता सोसवेना.
हा रस्ता सारा वेगळाच मनास वाटे,
नाही माहित जाईल तो पुढे अन् कुठे. 
हीच प्रेमाची चाहूल आयुष्यभर बहरूदे,
नात्याच्या बंधात एकमेकात गुंफूनी ती फुलू दे.

©Mayuri Bhosale #प्रेमाची चाहूल