Nojoto: Largest Storytelling Platform

कुणी हाक देता 'बाबा' म्हणोनी डोळ्यांत पाणी दाटून य

कुणी हाक देता 'बाबा' म्हणोनी
डोळ्यांत पाणी दाटून येते
परतुनी ये ना, कुशीत घे ना
बाबा, मज तुझी आठवं येते

ठेच लागता, अश्रू येता
नजर शोधते तुला भोवती
झाले पोरकी तुझ्याविना मी
कशी जगू रे सांग एकटी?

किती मी देवू हाक तुला रे?
आर्त ऐकूनी कधी पाघळशील?
या लेकीला गोंजाराया
कधी आता तू परतून येशील?

चेहरा तुझा डोळ्यांत आणि
आठवणी साऱ्या मनोमनी
ये ना परतून एकदा तरी
लेक आळवे क्षणोक्षणी

- संचिता गड्डमवार ✍️

©sanchita gaddamwar #बाबा
कुणी हाक देता 'बाबा' म्हणोनी
डोळ्यांत पाणी दाटून येते
परतुनी ये ना, कुशीत घे ना
बाबा, मज तुझी आठवं येते

ठेच लागता, अश्रू येता
नजर शोधते तुला भोवती
झाले पोरकी तुझ्याविना मी
कशी जगू रे सांग एकटी?

किती मी देवू हाक तुला रे?
आर्त ऐकूनी कधी पाघळशील?
या लेकीला गोंजाराया
कधी आता तू परतून येशील?

चेहरा तुझा डोळ्यांत आणि
आठवणी साऱ्या मनोमनी
ये ना परतून एकदा तरी
लेक आळवे क्षणोक्षणी

- संचिता गड्डमवार ✍️

©sanchita gaddamwar #बाबा