12 वर्षांनंतर कपिलवस्तू मध्ये प्रवेश केल्यावर शाक्य राजे शुध्दोधन बुद्धांना म्हणतात शुध्दोधन : पुरे झालं तुझं संन्याशाचं नाटक. मी आता म्हातारा झालो आहे. सिद्धार्थ आता तू परत आला आहेस तर राज्य सांभाळ बुद्ध : राजन डोळे वर करून एकदा माझ्याकडे बघ तर, जो गेला होता तो परत आलेला नाही. जो गेला होता तो सिद्धार्थ होता जो परत आला तो बुद्ध आहे. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आज बुद्ध पौर्णिमा आहे सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा. गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झाल्याने त्यांच्या स्मरणार्थ बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. गौतम बुद्ध यांचा विचार आजही आचरणात आणावा असा आहे. आजचा विषय आहे #ज्ञान1