Nojoto: Largest Storytelling Platform

ऐक ना माझ्या प्रियकरा, किती दिवस राहायचं फक्त मित्

ऐक ना माझ्या प्रियकरा,
किती दिवस राहायचं फक्त मित्र पक्ष
करुनि युती, काढू ना एकच पक्ष।

करू ना संसाराची स्थापन सत्ता
सात जन्म सोबतीने उपभोगू ना सत्ता।।

तू मुखमंत्री, मी गृहमंत्री
कालांतराने, आपल्या पिल्लांचे 
होऊ ना आपण पालकमंत्री।।

पंढरी च्या नाही तर, देव्हाऱ्यातील
विठ्ठलाची जोडीने करू ना पूजा
वारकरी म्हणून, आपणच घेऊ ना मान पहिला।।

जरा बंड तू कर ना, 
पाठिंबा द्यायला मी आहेच ना
माझ्या हायकमांड ला, खोके देऊन तरी पटव ना।। #अराजकीय  #पूजा
ऐक ना माझ्या प्रियकरा,
किती दिवस राहायचं फक्त मित्र पक्ष
करुनि युती, काढू ना एकच पक्ष।

करू ना संसाराची स्थापन सत्ता
सात जन्म सोबतीने उपभोगू ना सत्ता।।

तू मुखमंत्री, मी गृहमंत्री
कालांतराने, आपल्या पिल्लांचे 
होऊ ना आपण पालकमंत्री।।

पंढरी च्या नाही तर, देव्हाऱ्यातील
विठ्ठलाची जोडीने करू ना पूजा
वारकरी म्हणून, आपणच घेऊ ना मान पहिला।।

जरा बंड तू कर ना, 
पाठिंबा द्यायला मी आहेच ना
माझ्या हायकमांड ला, खोके देऊन तरी पटव ना।। #अराजकीय  #पूजा
poojashyammore5208

pooja d

New Creator