Nojoto: Largest Storytelling Platform

कुपी वाट आहे पाहतो मी फक्त एका उत्तराची भावनांना

कुपी

वाट आहे पाहतो मी फक्त एका उत्तराची
भावनांना कैद आहे रोखलेल्या आसवांची

यापरी होती बरी उबदार सूर्याची दशा
सोसवेना धग अताशा कोवळ्या या चांदण्याची

एकही सौदा अता जमणार नाही सावल्यांशी
सवयही होतेच आहे मोकळ्या उघड्या उन्हाची

वाटते चिंता तुझ्या त्या रम्य एकाकी घराची
नेम धरुनी सज्ज आहे नजर तिरकी वारियाची

आठवांचा गंध आहे दरवळाया लागलेला
सांडली नकळत कुपी का अंतरीच्य़ा अत्तराची ?

-सुरेश भट #feelings #Love #प्रेम #मराठी #कविता #सुरेशभट
कुपी

वाट आहे पाहतो मी फक्त एका उत्तराची
भावनांना कैद आहे रोखलेल्या आसवांची

यापरी होती बरी उबदार सूर्याची दशा
सोसवेना धग अताशा कोवळ्या या चांदण्याची

एकही सौदा अता जमणार नाही सावल्यांशी
सवयही होतेच आहे मोकळ्या उघड्या उन्हाची

वाटते चिंता तुझ्या त्या रम्य एकाकी घराची
नेम धरुनी सज्ज आहे नजर तिरकी वारियाची

आठवांचा गंध आहे दरवळाया लागलेला
सांडली नकळत कुपी का अंतरीच्य़ा अत्तराची ?

-सुरेश भट #feelings #Love #प्रेम #मराठी #कविता #सुरेशभट