Nojoto: Largest Storytelling Platform

वृत्तगंगा २४ कॅरेट उपक्रम क्रमांक-- १० सुमंदारमाला

वृत्तगंगा २४ कॅरेट
उपक्रम क्रमांक-- १०
सुमंदारमाला वृत्तलय

लगावली--लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा

तुझ्या सोबतीच्या युगाची कहाणी यशाच्या किनारी नव्याने मिळे 
सख्या घेत आहे तिथे मी उभारी सुखाच्या दिशेने मनाशी जुळे
अता जीवनाची निराशा पळाली तुझ्या पास आल्या सुखाच्या सरी
बसावी नव्याने घडी मोडलेली करू पावलांची सख्या चाकरी

नको दूर जाऊ अशा संधिकाली तुझ्या प्रेम वाटेत मी साजरी
खुले ठेव डोळे शराबी नशीले मनाच्या प्रितीची कळी लाजरी
छुप्या अंतराला तुझ्या जाणते मी नको आठवू त्या जुन्या तू व्यथा
तुझ्या जीवनाच्या प्रवासामधे मी मला सांग सा-या मनीच्या कथा

नको आठवाया विषारी शहारे नसे शांतवाया ठसे राजसा
अता पेलवेना निनावी तडाखे जुन्या काळजाला शोध माणसा
रहा पास माझ्या मला साथ दे तू हवा धुंद झाली निशा रंगली
तुलाही मलाही मनी ओढ वाढे इशारे नशीले तनू दंगली

स्मिता राजू ढोनसळे
नान्नज, जिल्हा-- सोलापूर

©Smita Raju Dhonsale वृत्तगंगा २४ कॅरेट