❤️💛❤️💛❤️💛 नात्यांमधील हळुवारता 💛❤️💛❤️💛❤️ अनघा अक्षरशः रोहनवर खेकसलीच "तुझ्याशी चार शब्द प्रेमाचे बोलायला मिळायला पाहिजेत म्हणुन मी रिक्षाने घरी न जाता एक-दिड किलोमीटर चालत जातेय आणि तु बोलायचं सोडुन लगेच फोन ठेवण्यासाठी घाई करतोस.. का पण? अरे दिवसभर ऑफिसमध्ये दिवसभर कॉंप्युटरसमोर बसुन काम करुन खुप त्रास होतो आणि तिकडे घरी गेल्यावर पुन्हा कामाचा रगाडा आहेच. खुप थकायला होतं रे. माझी खरी तक्रार ती नाहीच आहे पण तु नाही बोललास की माझी अजुन चिडचिड होते. तुझ्याशी बोलल्यावर एक वेगळीच उर्जा मिळते रे त्य