Nojoto: Largest Storytelling Platform

गझल तुझ्या प्रीतीचा आहे मी भुकेला आता तरी तु भुक

गझल

तुझ्या प्रीतीचा आहे मी भुकेला 
आता तरी तु भुक शमशील  का ||

तुझ्या दर्शनासाठी फिरतो सैरावैरा
आता तरी तुझे दर्शन घडवशील का ||

तुझ्या विना राहवत नाही मला
नयनाला नयन  भिडवशील का ||

माझ्या मनात सदा तुझेच विचार
तुझ्या ह्रदयात मला ठेवशील का ||

स्वप्नात माझ्या वनवा पेटवलीस तु
स्वप्न माझे पूर्ण करशील का ||

तुझ्या नयनात नकळत दिसतो होकार
तुझ्या प्रीतीची साथ मला देशील का ||

तु दिसली कि शब्दच ओठांवर येईना
अप्रत्यक्ष इशारा समजुन घेशील का ||

हात तुझा माझ्या हातात देउन
नाते प्रेमाचे घट्ट जोडशील का ||
 
 --- हरिष नैताम गझल
गझल

तुझ्या प्रीतीचा आहे मी भुकेला 
आता तरी तु भुक शमशील  का ||

तुझ्या दर्शनासाठी फिरतो सैरावैरा
आता तरी तुझे दर्शन घडवशील का ||

तुझ्या विना राहवत नाही मला
नयनाला नयन  भिडवशील का ||

माझ्या मनात सदा तुझेच विचार
तुझ्या ह्रदयात मला ठेवशील का ||

स्वप्नात माझ्या वनवा पेटवलीस तु
स्वप्न माझे पूर्ण करशील का ||

तुझ्या नयनात नकळत दिसतो होकार
तुझ्या प्रीतीची साथ मला देशील का ||

तु दिसली कि शब्दच ओठांवर येईना
अप्रत्यक्ष इशारा समजुन घेशील का ||

हात तुझा माझ्या हातात देउन
नाते प्रेमाचे घट्ट जोडशील का ||
 
 --- हरिष नैताम गझल