Nojoto: Largest Storytelling Platform

नाशिक शहरात भिमवाडीत लागलेल्या भिषण आगीत अनेक कु

नाशिक शहरात भिमवाडीत लागलेल्या  भिषण आगीत 
अनेक कुंटूब उध्वस्त झाली त्या कुटूबांना समर्पित....

#अग्नीकल्लोळ

भर दिवसा घडवला काळोख दिसेना झाली 
वस्ती माझी..
लोट उफाळून तू हसत होता..
 चिंध्यांचे तुकडे जोडून उभा केला होता,
शिवलेला संसार माझा..
हे संकटा तू असा ज्वाला बनून का आला..
खळगीला आधिच भिकेच गाठोडं बांधून
 जगायला आता च शिकलो होतो...
मुलीच्या लग्नाला तिचा कपाळाला
 लावायचा कुंकू ही 
जळाला..
अन स्वप्नांची राख मात्र तू देवून गेला..
मी तर नाही जळालो..पण...माझ्या विश्वातलं ते
 सुंदर अभयारण्य कोळसा होतांना डोळ्याने पाहिले मी...
वस्ती जळत होती माझी अन् 
मी डोळ्यातील पाण्याची फुंकर मारत राहीलो...
ती पेटत राहीली अन मी विझवत राहिलो...
विझवता विझवता...मनातल्या हुंदक्यांना दाबत राहिलो....
आता जळून सारी चुल माझी खाक झाली...
क्षणात वस्ती माझी राख झाली..

-संदीप मोरे, 
आशा ट्रेडर्स, 
अशोका फाउंडेशन, नाशिक #नाशिक