सरस्वती तू भगवति अंबे दुर्गा भवानि आई गं भक्तांच्या रक्षणास सत्वर धावत येसी आई गं ।।धृ।। नटून थटून नेसून साड्या देवळात त्या जाती गं कुंकू वेणी गुलाब अत्तर पूजेसाठी घेती गं खण अन नारळ घेउन ओटी भरते हरेक बाई गं भक्तांच्या रक्षणास सत्वर धावत येसी आई गं ।।१।। नवरात्रीला भजन आरत्या नऊ दिवस अन राती गं भोंडल्या सवे गरबा रंगे तुझिया सेवेसाठी गं तुझ्या दर्शने सगळा थकवा पळून माझा जाई गं भक्तांच्या रक्षणास सत्वर धावत येसी आई गं ।।२।। कलियुगामध्ये ठायी ठायी असूर दानव दिसती गं प्रत्येकीला करण्या रक्षण सत्वाचे दे शक्ती गं तुझ्या कृपेने अवघे संकट रसातळाला जाई गं भक्तांच्या रक्षणास सत्वर धावत येसी आई गं ।।३।। अखंड महिमा मुखी जगाच्या अंबे गाजत राही गं त्रिदेवसुद्धा तुझी जगाला सांगत असती महती गं कृपाप्रसादे सर्व जगाला सुखी ठेव तू बाई गं भक्तांच्या रक्षणास सत्वर धावत येसी आई गं ।।४।। ---१८/१०/२०२३ @१२:१५ ©उमा जोशी #navratri #धावा #हरिभगिनी