Nojoto: Largest Storytelling Platform

आषाढी एकादशीला रंगतात भक्तजन I किती शोभून दिसे स



आषाढी एकादशीला रंगतात भक्तजन I
किती शोभून दिसे सोहळा त्यात रमते मन  II
विठ्ठू माऊलीच्या गजरात पायी वारी I
ऊन वारा पाऊस पर्वा न करता गजरात स्वारी II१II

विठ्ठला विठ्ठला तुझ्या नामात सारे दंग I
टाळ वीणा चिपळ्या वाजे मृदुंग II
विटेवरी उभा विठ्ठू आणि कटेवरी हात I
सारे भक्तजन दंग विठ्ठू नामाच्या गजरात II२II

मस्तकी लावी चंदनाचा टिळा I
आई रूखमाई बाप विठ्ठल लावी लळा II
सावळा विठ्ठू होतो तू जगाची माऊली I
 भक्तगणसाठी नेहमी मायेची सावली  II३II

पुण्य वाढले की पाप विठूमाऊली I
तूच जाणे सर्व काही II
कधी तू तुझ्या लेकरांना I
सोडवशील महामारीतून  बोल आता काही..... II४II
-✍️( स्वलिखित) ✍️शितल कैलास पाटील ✍️






 शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
सर्वांना आषाढी एकादशी च्या खूप खूप शुभेच्छा...
||भेटीलागी जीवा|लागलीसे आस||
||पाही रात्रीं दिवस| वाट तुझी||
- संत तुकाराम

आजचा विषय आहे
ओढ वारीची...


आषाढी एकादशीला रंगतात भक्तजन I
किती शोभून दिसे सोहळा त्यात रमते मन  II
विठ्ठू माऊलीच्या गजरात पायी वारी I
ऊन वारा पाऊस पर्वा न करता गजरात स्वारी II१II

विठ्ठला विठ्ठला तुझ्या नामात सारे दंग I
टाळ वीणा चिपळ्या वाजे मृदुंग II
विटेवरी उभा विठ्ठू आणि कटेवरी हात I
सारे भक्तजन दंग विठ्ठू नामाच्या गजरात II२II

मस्तकी लावी चंदनाचा टिळा I
आई रूखमाई बाप विठ्ठल लावी लळा II
सावळा विठ्ठू होतो तू जगाची माऊली I
 भक्तगणसाठी नेहमी मायेची सावली  II३II

पुण्य वाढले की पाप विठूमाऊली I
तूच जाणे सर्व काही II
कधी तू तुझ्या लेकरांना I
सोडवशील महामारीतून  बोल आता काही..... II४II
-✍️( स्वलिखित) ✍️शितल कैलास पाटील ✍️






 शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
सर्वांना आषाढी एकादशी च्या खूप खूप शुभेच्छा...
||भेटीलागी जीवा|लागलीसे आस||
||पाही रात्रीं दिवस| वाट तुझी||
- संत तुकाराम

आजचा विषय आहे
ओढ वारीची...