भारतात अल्पसंख्याक कोण आहे? समाजात शांतता,एकोपा,भाईचारा टिकावा यासाठी मरणारा वैचारिक माणूस अल्पसंख्याक आहे. मुस्लिम बांधवांवर अन्याय-अत्याचार होताना त्याच्या बाजूने उभा राहणारा वैचारिक हिंदू बांधव अल्पसंख्याक आहे. आपल्या हॉस्टेल ची फीस,कॅन्टीन फीस वार्षिक 50 रुपये वरून 120 रुपया ने वाढली तेव्हा त्याविरोधात शिक्षणाचं बाजारीकरण करणाऱ्या शिक्षण संस्थेविरोधात आंदोलन करणारे विद्यार्थी अल्पसंख्याक आहेत. सत्य, अहिंसेचा पुरस्कार करणारी वैचारिक लोक अल्पसंख्याक आहेत. आपल्या समाजाची,धर्माची बाजू किंवा लोक चुकली असं म्हणणारी लोक अल्पसंख्याक आहेत. आम्ही ही चुकू शकतो व चुकीला चूक अन नलायकाला नालायक म्हणणारी लोक अल्पसंख्याक आहेत. भारत आपला कर्म आणि माणुसकी हा एकमेव धर्म जपणारी माणसे अल्पसंख्याक आहेत. आपला सागर😍🖋🖋🖋 #Delhi_Riots #थिंक ऑन इट